पाटणा – इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या पाटणा येथील संस्थेत एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. वैवाहिक स्थितीची माहिती घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अर्जांमध्ये संस्थेने अविवाहित आणि कुमारी शब्दांमध्ये गल्लत केल्यामुळे मोठा गदारोळ झाला. आता संस्थेने नवे अर्ज तयार केले आहेत.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांना अर्जामध्ये विचारण्यात आले आहे की त्यांचे लग्न झाले आहे का, त्यांना किती पत्नी आहेत आणि त्या विधवा आहेत की कुमारीका. बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी मात्र संस्थेची पाठराखण केली आहे. एम्ससुध्दा हाच शब्द वापरते असे सांगून आम्ही १९८३ पासून हाच नमुना वैवाहिक घोषणापत्रासाठी वापरतो असे पांडे म्हणाले. कुमारी आणि कौमार्य अशी गल्लत करू नका. अविवाहित म्हणजे कुमारी असा अर्थ आहे असे स्पष्टीकरणही संस्थेने केले आहे. तरीही त्यांनी विवाहाचे घोषणापत्र बदलून कौमार्यदर्शक शब्दाऐवजी अविवाहित हाच शब्द वापरला आहे.