पटना । राज्यात परीक्षांमधून चालणार्या ङ्गकॉपीफ विरोधात कठोर पाऊल उचलल्याने बिहारच्या सरकारी शाळांमधील निकाल कमी लागल्याचे सांगत या स्कॅमच्या माध्यमातून बिहारला बदनाम केलं जात आहे. बिहारचे लोकंच बिहारला बदनाम करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. बिहारमधील मटॉपर घोटाळ्याफ प्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी मौन सोडले. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी म्हटले आहे की, चोरी थांबवल्यामुळे असा निकाल लागला आहे. टॉपर स्कॅमला फेटाळत त्यांनी बिहारमध्ये शिक्षणात सुधार आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि आम्ही येणार्या दिवसांमध्ये तो सुधारु, असेही म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मखराब निकालापासून आम्ही धडा घेवू. परीक्षा कडकपणे घेतली गेली म्हणून निकाल खराब आला. 2017 मध्ये आर्ट्सचा टॉपर गणेश कुमारला वयाची माहिती लपवल्यामुळे अटक झाली आहे. तामिळनाडूमध्ये एका भर्ती परीक्षेत हरियाणाचा मुलगा टॉपर आला. सीबीआय त्याची चौकशी करत आहे. पण याची चर्चा नाही झाली. पण अशा प्रकारच्या घटना समाजातील लोकंच घडवतात, असे नितीशकुमार म्हणाले. दुसर्या राज्यातही अशाप्रकारच्या घटना घडत असतात. परंतु, त्यांना इतके महत्व दिले जात नाही. पण बिहारची बाहेर प्रतिमा मलीन करण्यामागे बिहारच्या बाहेरच्या लोकांचे नव्हे तर राज्यातील लोकांचीच मुख्य भूमिका असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कडक नियमांचा फायदाच
यावेळी नितीशकुमार म्हणाले की, कला शाखेत अव्वल आलेल्या गणेशचा निकाल रद्द केला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याची तुरूंगात रवानगी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परीक्षा किती कडक वातावरणात घेण्यात आली हे निकालावरून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आम्ही राज्यातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. मोठ्याप्रमाणात याचा फायदाही दिसून येत आहे. हे आमच्यासमोरील एक आव्हान असून ते आम्ही स्वीकारले असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी परीक्षेच्या काळात कुठेच घोटाळा किंवा कॉपी प्रकरण दिसून आले नाही.
काय आहे प्रकरण
बिहार शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. या परीक्षेत कला शाखेत गणेश कुमार हा गुणवत्ता यादीत झळकला होता. गणेश कुमारला संगीत विषयाच्या प्रॅक्टिकलमध्ये 70 पैकी 65 गुण मिळाले होते. तर लेखी परीक्षेत 30 पैकी 18 गूण मिळाले होते. याशिवाय हिंदी विषयात त्याला 100 पैकी 92 गूण मिळाले होते. गुणवत्ता यादीत झळकलेल्या गणेश कुमारची प्रसारमाध्यमांनी मुलाखत घेतली होती. यामध्ये संगीत आणि हिंदीविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. या मुलाखतीतून गणेश कुमारची पोलखोल झाली होती. त्याच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच बिहारचे शिक्षण मंत्री अशोक चौधरी आणि बिहार बोर्डाचे आनंद किशोर यांनी गणेश कुमारच्या निकालाला क्लीनचिट दिली होती. त्यानंतर बिहार बोर्डाने यूटर्न घेत गणेशचा निकाल रद्द केला होता.