बिहारी भूमिकेदरम्यान छटपूजेचे महत्व समजले – हृतिक रोशन

0

मुंबई : बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन याने छट पूजेच्या मुहूर्तावर बिहारी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देतांनाचा व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवर टाकला आहे. हृतिक रोशन आपल्या आगामी चित्रपटाची तयारी करत असून हृतिकचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’मध्ये तो एक बिहारी माणसाची भूमिका करतोय. बिहारी भूमिकेदरम्यान त्याला छटपूजेचे महत्व कळत असल्याचे त्याने सांगितले. हृतिकने म्हंटले आहे की, लहानपणा पासून तो छटपूजा पाहतो आहे. मात्र बिहारी माणसाच्या भूमिकेमुळे या पूजेचा अर्थ समजला असल्याचे त्याने म्हटलं आहे. लोकांना पूजा झाली का असा प्रश्न लोकांना विचारला. हृतिकने आपल्या घरातूनच हा व्हिडियो काढला. हृतिकला बघण्यासाठी पूजेसाठी जमलेल्या लोकांनी एकच गर्दी केली.

काय म्हणाला हृतिक

“छटपूजा ही ठिक माझ्या घरा समोर होते. मी नेहेमीच या लोकांना उत्साहात आणि जोमात बघतो. लोकांचा उत्साह बघून मला आर्श्चय वाटते. आगामी चित्रपटात बिहारी नागरिकाची भूमिका करतांना मला या पूजेचे महत्व समजले. हा उपास ठेवणाऱ्यांचा मी आदर करतो आणि सर्वांना छट पूजेच्या शुभेच्छा मी दोतो”- हृतिक रोशन

मागील वर्षीही दिल्या होत्या शुभेच्छा

हृतिकने या वर्षी प्रमाणेही मागील वर्षीही लोकांना छटपूजेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. हृतिकचे घर समुद्र किणाऱ्या जवळ असल्यामुळे घराच्या बालकनीतून त्याला पूजेसाठी येणारे भाविक दिसतात. मागीलवर्षीही हृतिकने बालकनीत येऊन लोकांना शुभेच्छा दिल्या होत्या. बॉलिवूडच्या या सुपरहिरोला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. सध्या हृतिक ‘सुपर ३०’ चित्रपटाच्या तयारीत आहे. या चित्रपटात हृतिक एक समान्य माणसाची भूमिका करणार आहे. हृतिक आपल्या आगामी चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. नेहेमीच वेगळी भुमिका करण्याचा प्रयत्न करणारा हृतिक आता प्रेक्षकांना सामान्य नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.