बिहार निवडणूक निकाल: एक्झिट पोल फेल ठरण्याची चिन्हे; एनडीए बहुमताजवळ

0

पटना : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलप्रणीत आघाडी पुढे होती. मात्र आता एनडीएने आघाडी घेतली आहे. एनडीएला १२१ जागांवर आघाडी आहे तर महागठबंधनला १०९ जागांवर आघाडी आहे. सुरुवातीला चित्र उलट होते, महागठबंधनला १२० पेक्षा अधिक जागांवर होती, तर एनडीएला १०० पेक्षा कमी जागांवर आघाडी होती. मात्र आता चित्र फिरले आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.