८० लाखांच्या जवळपास मतमोजणी पूर्ण
पटना : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीचे दोन तास वगळता एनडीए (भाजप, जेडीयू)ने आघाडी घेतली आहे. एनडीए १२८ जागांवर आघाडी घेतली आहे तर महागठबंधन (आरजेडी, कॉंग्रेस)ने १०५ जागांची आघाडी घेतली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने दुपारी १ वाजेपर्यंत केवळ २० टक्के मतमोजणी झाली आहे. तब्बल ८० टक्के मतमोजणी शिल्लक आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु राहील असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ८० लाख मतमोजणी झाली आहे, जवळपास ४ कोटी मतदान झाले आहे.
बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मात्र एक्झिट पोल पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. भाजप ७२, आरजेडी ६६, जेडीयू ४८ , कॉंग्रेस २२ जागांवर आघाडीवर आहे.