बीआरटीत ११४.३९ कोटींचा घोटाळा- ईडीतर्फे चौकशीची मागणी – ॲड. सचिन भोसले

0

पिंपरी :- गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेला महापालिकेचा बीआरटीएस् प्रकल्प पुन्हा नवीन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बीआरटीएस् प्रकल्पामध्ये सत्ताधारी आणि संबंधित अधिकार्यांनी मिळुन ११४.३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर झालेल्या भ्रष्टाचाराची ईडीमार्फतचौकशी करूनकारवाई करण्यात अशी मागणी यावेळी भोसले यांनी केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, नगरसेविका रेखा दर्शीले, विभाग प्रमुख विक्रम वाघमारे उपस्थित होते.

माहितीमध्ये फेरफार
गेल्या अनेक दिवसांपासून सचिन भोसले हे बीआरटी बद्दल महापलिकेच्या अधिकार्यांकडे पाठपुरावा केला असून माहिती घेतली. यामध्ये एकाच प्रकप्लाबाद्द्ल दोन वेगवेगळ्या माहितीमध्ये कोट्यावधींचा फेरफार झाल्याचा समोर आले आहे. ॲड. भोसले यांनी २४ एप्रिल २०१८ रोजी मनपा प्रशासनाला बीआरटी प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता . त्यासंबधी भोसले यांना महापलिकेच्या दोन वेगवेगळ्या विभागातून माहिती मिळाल्या, ज्यामध्ये ११४.३९ कोटींचा तफावत आढळून आली. या दोन्ही माहिती पत्रात 890.47 – 776.08 = 114.39 कोटी रुपयांचा फरक आहे. याचाच अर्थ मागील दहा वर्षांमध्ये या प्रकल्पावर काम करणा-या अधिका-यांनी, पदाधिका-यांनी ठराविक ठेकेदारांचे हितसंबंध जोपासत स्व:ताची घरे भरण्याचे काम केले. शहरातील नागरीकांनी कष्टाने भरलेला कर या अधिका-यांनी, पदाधिका-यांनी संगनमताने हडप केला असल्याचा आरोप ॲड. भोसले यांनी केला.पूर्वीच्या आणि आत्ता सत्तेतअसलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदधिकारयानी बीआरटी प्रकल्पामध्ये कोट्यावधींचा घोटाळा केला असून त्यांची सखोल चौकशी ईडीमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात येण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा भोसले यांनी म्हटले आहे.

प्रकल्प अद्याप अपूर्ण
२००७ साली गाजा वाजा करत बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला खरा, मात्र दहा वर्षानंतर देखील हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. संपूर्ण प्रकल्पातील फक्त औंध – रावेत आणि नाशिक फाटा ते वाकड हे दोनच मार्गच अंशत:सुरु झाले आहेत. त्यातही काही ठिकाणी बसस्टॉप ची दुरावस्था झाली आहे. तर इतर मार्गांवर अर्धवट बसस्टॉप पडून आहे. तर काही ठिकाणी बीआरटी रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग केली जात आहे. असून सामान चोरीला जात आहे. मात्र पालिका प्रशासन या बाबत गंभीर नसल्याच चित्र आहे. बीआरटी च्या एका बसस्टॉप वर महापालिका ४० ते ५० लाख रुपये खर्च करून फक्त लोखंडी सांगाडे उभारण्यात आले आहे. असे औकून ८४ बसस्टॉप मध्ये देखील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याच दिसून येत आहे.निगडी ते दापोडी या बीआरटी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे बीआरटी मार्गावरच ख्गान्ब उभे करण्यात आले असून बीआरटीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर बीआरटीएस प्रकल्प बंद पडल्यानंतर देखील अद्याप या प्रकल्पावर देखभालीसाठी सुरक्षा यंत्रणा, उद्यान विभाग, विद्युत व स्थापत्य विभागाचा वेगळा खर्च अजूनही सुरुच आहे. हा खर्च नेमका ठेकदारांचे खिसे भरण्यासाठी होत आहे का असा प्रश्न भोसले यांनी उपस्थित केला आहे.