बीएचआरप्रकरणी जितेंद्र कंडारे याला आणले जळगावात

मुख्य शाखेत कागदपत्रांची शोधाशोध सुरू

जळगाव – बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणी तत्कालिन अवसायक, संशयित आरोपी जितेंद्र कंडारे याला पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात आणले आहे. त्याच्यामार्फत पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील कागदपत्र व काही व्यवहारांबाबतच्या फाइल्सची शोधाशोध सुरू आहे.पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे दोन अधिकारी व पाच कर्मचार्‍यांच्या पथकाने कंडारे याला जळगावात आणले असून हे पथक तपासकामी शहरात ठाण मांडून आहे.

आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडीटमध्ये अंदाजे ६५० कर्जखाती एफडी मॅचिंगद्वारे निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, यापैकी अनेक कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज फाइल्स पुराव्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या फाइल्सचा शोध आर्थिक गुन्हे शाखेचे तपासाधिकारी कंडारे याच्यामार्फत घेत आहेत. यासंदर्भात जितेंद्र कंडारे याची कसून चौकशी सुरू आहे.