बीएचआर घोटाळा : अवसायक जितेंद्र कंडारेचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला !

No relief for BHR employee Jitendra Kandare: Court rejects bail application जळगाव : बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात अटक करण्यात आलेेले संशयीत आरोपी अवसायक जितेंद्र गुलाबराव कंडारे यांचा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी केली होती अटक
बीएचआर पतसंस्था अवसायनात आल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन सरकारने जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली मात्र पतसंस्थेने वाटलेल्या कर्जाची वसुली करून ठेवीदारांच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या ठेवी परत करायच्या होत्या तर केलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता लिलाव प्रक्रिया राबवून त्यातून येणार्‍या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या उत्पन्नातून पतसंस्थेला अवसायनातून बाहेर काढणे आवश्यक असताना अवसायक कंडारे याने संशयीतांशी संगनमत करीत मोठा गैरव्यवहार केला. या प्रकरणी पुणे येथील शिक्रापूर पोलिस ठाण्यात व रज्यभरात ठिकठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयीत तथा अवसायक जितेंद्र कंडारेला शिक्रापूर पोलिसांनी २५ डिसेंबरला अटक केली होती तर कंडारे यांच्याविरोधात व इतर आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.