कंडारेचा अटकेतील चालकाकडून तपासात उडवाउडवीचे उत्तरे
जळगाव: बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या अवसायक जितेंद्र कंडारे याचा चालक मलाकर भिकाजी कोळी (वय 28,रा. के.सी.पार्कच्या मागे) हा तपासात आर्थिक गुन्हे शाखेला सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान कंडारेसोबत राज्यभरात कोळी हाच फिरत असायचा. तसेच त्याच्यासमोरच कंडारेने अनेक व्यवहार केल्याचा पथकाला संशय आहे. दरम्यान कंडारे याच्या वाहनावर एक नव्हे तर तीन चालक होते,अशी माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान तेही रडारवर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
अटकेतील चालक कमलाकर भिकाजी कोळी (वय 28,रा. के.सी.पार्कच्या मागे) हा सतत कंडारेला घेऊन औरंगाबाद, बुलडाणा, अहमदनगर, पुणे व नंदूरबार येथे जात होता. त्यामुळे या ठिकाणी देखील संस्थेच्या मालमत्ता किंवा इतर व्यवहार असण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी सुनील झंवर, प्रकाश वाणी व कुणाल शहा यांच्याविषयी देखील चालकाकडे बर्यापैकी माहिती आहे, मात्र त्याने अजून तपासात सांगितलेले नाही. कमलाकर हा देखील तपासात सहकार्य करीत नसून उडवाउडवीचे उत्तरे देत आहे.
जितेंद्र कंडारे हा कोणकोणत्या ठिकाणी जायचा, काय करायचा, अशी इत्यंभुत माहिती कंडारेचा चालक कोळी यास माहिती आहे. त्याच्या चौकशीतून अनेक बाबी तसेच राज्यभरात इतर ठिकाणी काही व्यवहार झाले आहे का त्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तसेच कंडारे हा फरार असल्याने तो कोणकोणत्या ठिकाणी जावू शकतो, किंवा असू शकतो, याबाबतही कोळी याच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता असल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.