पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणे महत्वाचे; निविदा भरणार्यांना डमी म्हणून उभे करुन इतरांनीच मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता
जळगाव: बीएचआर घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राज्यभरात बीएचआरची मालमत्ता खरेदी करणारे तसेच या मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणार्यांची यादी माध्यमांना दिली. मालमत्ता खरेदी करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष निविदा भरुन व्यवहार केला. तर काहींना निविदा भरण्यासाठी डमी पध्दतीने उभे करण्यात येवून या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. तर काहींच्या नावे निविदा प्रकिया राबविली गेली असतांनाही संबंधित याप्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीएचआर संबंधित मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्यात असून त्यांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचा सूर व्यक्त होत आहे. संबंधितांच्या चौकशीतून निविदा भरणारे वेगळे तर प्रत्यक्षात मालमत्ता खरेदी करणारे वेगळेच असल्याबाबत दूध का दूध और पाणी का पाणी याप्रमाणे वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेवून याप्रकरणात कारवाई यासाठी कशा पध्दतीने पाठपुरावा केला तसेच तक्रार केल्या. तसेच कागदपत्र मिळविली याबाबत माध्यमांना माहिती दिली. मालमत्ता खरेदी करणार्यांमध्ये साई मार्केटींग अॅण्ड टे्रडींग कंपनीच्या नावे संशयित सुनील झंवर यांनी निविदा भरल्या तसेच मालत्ता खरेदी केल्या. झंवर प्रमाणेच जळगाव शहरातील बीचएचआरच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी जळगाव शहरातील काहींनी निविदा भरल्या. निविदा भरल्या. मात्र व्यवहार पूर्ण केला नाही. खडसेंनी दिलेल्या कागदपत्रानुसार निविदा भरणार्या अरुण सोनार रा. आशाबाबा नगर, शिवकॉलनी, आकाश माहेश्वरी बलदवा निवास, भागवत रोड, अमळनेर व छगन विठ्ठलराव कोरडे रा. आदित्य नुतनवर्षा कॉलनी, विठ्ठलमंदिर, मोहाडी रोड, महाबळ परिसर जळगाव यांच्याशी दै. जनशक्तिने बातचित केली. यात माहेश्वरी यांनी निविदा भरली होती मात्र, व्यवहार रद्द झालेला असल्याचे सांगत संबंधित मालमत्ता बीएचआरच्याच नावावर असल्याचे सांगितले.
मी निविदा भरलीच नाही, माझे नाव कसे आले?
खडसेंनी दिलेल्या कागदपत्रानुसार अरुण सोनार यांनी प्लॉट नं. 14, दुसरा मजला, साई प्लाझा बिल्डींग, मेहरुण, जळगाव या बीएचआरच्या मालमत्तेसाठी निविदा भरल्याचे दिसून येत आहे. अरुण सोनार यांच्याशी संपर्क साधला असता, मला याबबात काहीही माहिती नाही, आजच्या पेपरमध्ये बातमी आल्यावरच मला काय ते कळाले. नेमके यात माझे नाव कसे आले ते मला माहिती नाही. मी सुनील झंवर कोण त्यालाही ओळखत नाही. असे धक्कादायक उत्तर दिले. तसेच कुणी तरी दुश्मनी काढण्यासाठी माझ्या नावाचा वापर केल्याचा धक्कादायक खुलासाही सोनार यांनी केला. मी बाहेरगावी लग्नाला असून घरी आल्यानंतर संबंधित प्रकाराची माहिती घेतो, असे सोनार म्हणाले. मला संबंधित मालमत्ता, कोणाची बीएचआर वगैरे याबाबतही काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट सांगितले.
निविदा भरली, मालमत्ता खरेदीबाबत माहिती नसल्याचे उत्तर
सलून व्यावसायिक असलेल्या छगनराव कोरडे यांचेही कागदपत्रात नाव असून त्यांनीही महाबळ रोडवरील साची अपार्टमेंटमध्ये दुकान नं 8 व 9 साठी निविदा भरल्याचे दिसून येत आहे. त्यांना विचारणा केली असता, निविदा भरल्याबाबत त्यांनी होकार दिला. सुनील झंवर माझे मित्र असल्याचे सांगत त्या माध्यमातून निविदा भरल्याचेही ते म्हणाले. निविदा प्रकिया माहिती आहे. मात्र नेमकी संबंधित मालमत्तेची खरेदी तुम्ही केली का? की तुमच्यानावावर निविदा भरुन इतरांनी खरेदी केली? याबाबत काही माहिती नसल्याचे उत्तर कोरडे यांनी दिले.
निविदा दुसर्याच्याच नावे, व्यवहार तिसर्यानेकडून झाल्याचा संशय
संबंधित निविदा भरणार्यांकडून माहिती घेतल्यानंतर अरुण सोनार यांनी ज्या पध्दतीने संबधित प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. त्यावरुन निविदा दुसर्याच्याच नावाने भरुन तिसर्याच कुणीतरी व्यवहार करुन मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. केवळ निविदा भरण्यासाठी डमी म्हणूनही काहींचा वापर झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआरची मालमत्ता खरेदी करण्यासाठी निविदा भरणार्यांचीही चौकशी करणे गरजेचे आहे. या चौकशीतून प्रत्यक्षात बीएचआरची मालमत्ता खरेदी करणारे समोर येण्याची शक्यता