बर्लिन- प्रत्येकाचे आयुष्यात बीएमडब्ल्यू या अलिशान कारमध्ये फिरण्याची इच्छा असते. दरम्यान बीएमडब्ल्यू कारला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याच्या कारणाने बीएमडब्ल्यू कार निर्माता कंपनी तब्बल 10 लाख कार माघारी बोलावल्या आहेत. एक्झॉस्ट सिस्टमला आग लागत असल्याचे कारण देण्यात आले आहे.
बीएमडब्ल्यूच्या कारमध्ये कुलंट सदोष पार्टमधून लीक होत आहे. एक्झॉस्ट गॅस सर्क्युलर कुलरमधून हे कुलंट लीक होत असल्याने इतर पदार्थांच्या संपर्कात आल्याने आग लागण्याची शक्यता आहे. यामुळे या डिझेल कार माघारी बोलाविण्यात आल्या आहेत, असे कंपनीने जाहीर केले आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये 4.8 लाख कार माघारी बोलाविण्यात आल्या होत्या हा आकडा मिळून एकूण 1.6 दशलक्ष कार माघारी बोलाविण्यात आल्या आहेत.