१४ ते १६ सप्टेंबर कालावधीत ग्रंथप्रदर्शन
पुणे । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) टाटा हॉलमध्ये १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते १४ सप्टेंबरला स. १०:३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ‘वाचन संस्कृती आणि आजचा युवक’ या विषयावर डॉ. अवचट मार्गदर्शन करणार आहेत. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
व्यवसाय मार्गदर्शक डॉ. श्रीराम गीत यांचे ‘करिअर नियोजनात वाचनाचे महत्त्व’ या विषयावर १५ सप्टेंबरला स. १०:३० वाजता व्याख्यान होणार आहे. मेघना झुजम ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग १६ सप्टेंबर रोजी स. १०:३० वाजता सादर करणार असून, यशवंतराव चव्हाण समाज विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. बी. टी. लावणी यांचे ‘समाज परिवर्तनात विद्यार्थ्यांचे योगदान’ या विषयावरील व्याख्यान स. ११:३० वाजता होणार आहे.