बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराबाबत खासदार रक्षा खडसेंनी काढले वाभाडे

0

भुसावळ- जळगाव जिल्ह्यातील बँकांमध्ये बीएसएनएल इंटरनेट वापरले जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत होती. ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने खासदारांकडे येत होत्या. 11 जुलै रोजी खासदारांनी बीएसएनएलच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती त्यात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ग्रामीण भागात बीएसएनएलच्या टॉवरला रेंज मिळत नाही. जिल्हा पातळीवर बीएसएनएलची तक्रार निवारणाची सोय नाही याची दूरसंचार मंत्रालयाने दखल घेण्यासंदर्भात लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये बुधवारी खासदार रक्षा खडसे यांनी तारांकीत पुरवणी (प्रश्न क्र. 102 द्वारा) उपस्थित केला. या प्रश्‍नावर दूरसंचार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी उत्तर देताना सांगितले की, जिल्हा पातळीवर तक्रार निवारणाची सोय असून खासदारांचे समाधान न झाल्यास त्यांनी सरळ आमच्याकडे तक्रार द्यावी आम्ही त्याचे निवारण करू. खासदारांच्या या पवित्र्याने जळगाव जिल्ह्यातील बीएसएनएल अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.