बीएसएनएल कर्मचारी एक दिवसीय संपावर

0

जळगाव। बीएसएनएल मधील सर्व प्रमुख कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने आज जानेवारी पासूनचा नवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला असून त्यात जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी बीएसएन एप्लॉईज युनियन (ईयू), संचार निगम एक्झीकीटीव्ह असोसीएशन (एसएनइए), दूरसंचार तांत्रिक सहाय्यक संचार निगम एसोसिएशन (एसएनएटीटीए), ऑल इंडिया ग्रॅज्युएट इंजिनियर टेलीकॉम ऑफिसर्स असोसिएशन (एआयजीईटीओए), बीएसएनएल मॅनेजमेन्ट सर्व्हिसर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. हा संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा विविध संघटनांच्या नेत्यांनी केला आहे.

बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या या मागण्या
1 जानेवारी 2017 पासून नवा वेतन व पेन्शन करार लागू करावा, थेट भर्ती अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्ती लाभ निश्‍चित करावा, ट्रेड युनियन गतीविधिंवरील निर्बंध हटवावे आदी मागण्यांसाठी येथील बीएसएनएल महाप्रबंधक कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी निदर्शनेही केली. त्यात सर्व संघटनांचे पदाधिकारी निलेश काळे, एल.यु. चौधरी, बी.एस. सोनवणे, प्रदीप सोनवणे, अभिजित पाटील, शशिकांत सोनवणे, सुरेश वाघ, प्रदीप चांगरे, शालिक पाटील, एस.एस. कुळकर्णी, डी.जी. डहाके, आर.एस. नेहेते, व्ही.एस. महाजन, अमित कुळकर्णी, नितीन रस्से, तुकाराम लोखंडे, अकील शेख, व्ही.व्ही. कोळी, अनिल चिरमाडे, विवेक अमृतकर, सुनील तायडे, मोहन नेवे आदींनी सहभाग घेतला.