बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या एक दिवसीय संपास प्रतिसाद

0

भुसावळ। भारतीय दूरसंचार क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बीएसएनएल डिटीओ कंपाउंडसमोर गुरुवार 27 रोजी एकदिवसीय संप करण्यात आला. या संपात जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, अधिकारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संप 100 टक्के यशस्वी केला. यामध्ये बीएसएनएलईयु, एसएनईए, एसएनएटीटीए, एआयजीइटीओए, बीएसएनएलएमएस, बीएसएनएलओए या विविध कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आले आंदोलन
संघटनेच्या मागण्यांमध्ये 1 जानेवारी 2017 पासून नवा वेतन करार लागू करुन पेन्शन रिव्हीजन करणे, थेट भर्ती अधिकारी व कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती लाभ निश्‍चित करणे, ट्रेड युनियन गतीविधींवरील निर्बंध हटवावे या मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी आंदोलनात मोर्चाचे संयोजक के.के. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आर.पी. पाटील, के.डी.सरोदे, आर.आर. वाणी, अनुपम मिश्रा, रिझवान शेख, व्ही.बी. सरोदे, के.के. चौधरी, अजय वाघोदे, एल.पी. पाटील, यु.सी. श्रीमते, व्ही.व्ही. अहिर, एन.एम. सपकाळे, डि.एच. पाटील, आय.एच. खान, डि.पी. पाटील यांनी सहभाग घेतला.