नवी दिल्ली । सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या जवान तेज बादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे. बीएसएफ कायद्यान्वये त्याला बडतर्फ करण्यात येत असल्याचं कोर्ट ऑफ इन्क्वायरीने स्पष्ट केले आहे. खोटी तक्रार करून बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर तेज बहाद्दूर यांनी आणखी एक व्हिडिओ करून छळ सुरू असल्याचा आरोपही केला होता. मात्र, बीएसएफने तेज बहाद्दूर यांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. खोटी तक्रार करून बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप तेज बहाद्दूर सिंह यांच्यावर होता. कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये ज्या जवानांची चौकशी केली, त्यापैकी कोणीही निकृष्ट जेवण दिले जात असल्याची तक्रार केलेली नाही. तर दुसरीकडे तेज बहाद्दूर यांना धमकी दिली जात असून त्यांचा मानसिक छळही सुरू असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
स्वाभाविकच, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयानं गृहखात्याकडून आणि बीएसएफकडून अहवाल मागवला होता. त्यानंतर अगदी वरपासून खालपर्यंत सूत्र हलली होती. त्यातून आता, तेज बहादूरच्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आलंय. तेज बहादूरसोबत असलेल्या जवानांशी आम्ही बोललो, तेव्हा जेवणाबद्दल कुठलीही तक्रार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, धमक्या आणि मानसिक छळाच्या त्याच्या आरोपातही तथ्य आढळून आले नाही.