बीएसएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार जवान शहीद

0

बस्तर: छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामधील कांकेर भागात आज नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. यावेळी झालेल्या चकमकीत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह तीन कॉन्स्टेबल शहीद झाले आहेत. बीएसएफ जवान महाला परिसरातील जंगलात गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला मोठा असल्याचे मानले जात आहे. नक्षलवाद्यांनी या हल्ल्यातून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संदेश दिला असल्याचे सांगितलं जात आहे. याआधी नक्षलवाद्यांनी बस्तर आणि कांकेर येथे बॅनर्स लावून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास सांगितले होते. नक्षलवादीग्रस्त भागातील मतदारसंघांमध्ये सुरळीत निवडणूक पार पडावी यासाठी निमलष्करी दलाला तैनात करण्यात आलं आहे. 11 एप्रिलला बस्तर आणि 18 एप्रिलला कांकेर मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे.