शिरपूर । भारतीय जैन संघटनेच्या कामाकरिता तीन महिन्यात काय मला तीन दिवसात बोलवा येईल असे आश्वासन धुळे जिल्ह्यांचे संपर्क मंत्री दिपक चोपडा यांनी दिले. शहरातील जैन नुतन स्थानकांत जैन समाज बांधवांची आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थितांना चोपडा मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी दिपक चोपडा, जयप्रकाश आंचलिया, प्रा. चंद्रकांत डागा, विजय दुग्गड, किशोर बोथरा, सुवालाल ललवाणी, नवनीत राखेचा, राजेंद्र डागा, विजय बाफणा आदी उपस्थित होते.
शेतकर्यांच्या परिवारातील 825 मुलांच्या शिक्षणाची हमी
दिपक चोपडा हे जिल्ह्यात मार्गदर्शनासाठी आले होते. जैन संघटना ही भारतातच नव्हे तर परदेशात मदतीच्या कार्यांसाठी धावून जाणारी भारतीय जैन संघटना आहे. संघटनेतर्फे कर्जापोटी आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या परिवारातील 825 मुलांच्या शिक्षणाची हमी घेवून त्यांचे पालकत्व स्विकारण्यात आले आहे. समाजाच्या तरूण, तरूणींनी स्वबळावर टिकण्याचे सराव करावे. आपल्या धंद्यात आधुनिकता कशा प्रकारे असावी यासाठी सातत्याने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी महावीर पतपेढीचे चेअरमन सुवालाल ललवाणी व विजय बाफणा यांनी ही जैन समाजातील समस्यांना वाचा फोडली. जयप्रकाश आंचलिया तसेच प्रा. चंद्रकांत डागा यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलान राजेंद्र पारख यांनी केले. भारतीय जैन संघटनेची कार्यकारणी -अध्यक्ष उत्सव दुधेडीया, उपाध्यक्षपदी सचिन दुग्गड, सेक्रेटरी नववीत चोरडिया व कोषाध्यक्ष पदासाठी अशोक बाफणा यांची तर जिल्हा कार्यकारणीत नवनीत राखेचा, विजय बाफणा, विभागीयपदी राजेंद्र पारख, धनसुख साब्रदा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यशस्वीतेसाठी राजेंद्र पारख, मुन्ना ललवाणी, उमेश लोढा, अजय लोढा, ललित कोचर, गणेश कोचर आदींनी कामकाज पाहिले.