बीडमध्ये ऊस लागवडीत वाढ

0

बीड । गतवर्षीअखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात तिपटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. गतवर्षी कापूस व तुरीला योग्य भाव न मिळाल्याने संरक्षित पाणीसाठा उपलब्ध असलेले शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार उसाचे क्षेत्र 36 हजार हेक्टरवर गेले आहे. जिल्ह्याला सलग चार वर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत होता.