बीडमध्ये खासगी बसला भीषण अपघात, 9 जण ठार

0

बीड:  मुंबईहून लातूरला निघालेल्या खासगी प्रवासी वाहतूक बसला झालेल्या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील धानोरा गावाजवळ घडली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू, तर 27 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.  रविवारी पहाटे प्रवासी झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मुंबईहून लातूरच्या दिशेने जाणार्‍या सागर ट्रॅव्हल्सची बस भरधाव वेगात असताना ड्रायव्हरचे  नियंत्रण सुटल्याने बस एका अवघड वळणावर रस्ता सोडून उलटली आणि 100 फुटांवर जाऊन पडल्याने 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. ज्यात दोन महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. बसचा ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होता असे प्रवाशांनी सांगितले.

मृतकांमध्ये 2 महिलांचा समावेश अपघाताची माहिती समजताच बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना अहमदनगर रुग्णालयात हलवले. या अपघातात रशीद अब्दुल रज्जाक कुरेशी (60 रा. बाराभाई गल्ली अंबाजोगाई, जि. बीड), आतिक खान मुनवर (32 रा. हो. जवळा ता. केज जि. बीड), मेहरुन्निसा आमिन पटेल (35 रा. मुंबई), आसिमा नजीम सय्यद (45 मुंबई), सर्जेराव लक्ष्मण पवार (30 वाटीवाडा तांडा ता.धारूर जि.बीड), योगेश गौतम टकले (30 चिखली ता.आष्टी जि.बीड), पठाण बहादूर पठाण इस्माईल (65 रा. बसवेश्‍वर जि.लातूर), सुनील मल्हारी कुंभारकर (45 रा. कर्वेनगर, पुणे), चांद पाशा ताजोद्दीन पठाण (66 रा. नेकनूर, ता. बीड) आदींचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अहमदनगरमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.बॉक्सजखमींची नावे  तर रमाकांत चंद्रकांत केदारी (30 पुणे), प्रियंका अंगद जोगदंड (23), अंगद शिवाजी जोगदंड (26), सोनाली संतोष जोगदंड (12), विलास अंगद जोगदंड (4 सर्व रा. दैठणा ता.अंबाजोगाई जि. बीड), आशा चांद सय्यद (45 रा. नेकनूर) वंदना विजय सुर्यवंशी (26), स्वप्नाली विजय सूर्यवंशी (सर्व रा.गौर ता. निलंगा जि.लातूर),  बाळासाहेब खाडे (40 देवळाली पानाची ता.आष्टी), तबसून मुज्जमील कुरेशी (25), मुद्दसीर मुज्जमील कुरेशी (6, रा.अंबाजोगाई), उमेश ब्रम्हदास चव्हाण (21 रा. अकोला जि. वाशीम),  बाबा गोरक्ष सरवदे (27 रा.भुसुंदरगा जि.लातूर), शांताबाई ज्ञानोबा जाधव (50), सुकन्या अशोक जाधव (25) अथर्व अशोक जाधव (4), अनुष्का अशोक जाधव (10 सर्व रा. मुंबई), मुस्कान आमिन पटेल (12), मोहमद हसन पटेल (6 दोघेही रा. मुंबई), विजय राघवण (18 तामीळनाडू), मोहन व्यंकट वाघमारे (47), मीना मोहन वाघमारे (34), शुभम मोहन वाघमारे (16), चैतन्य मोहन वाघमारे (10 सर्व रा. नळेगाव ता. चाकूर जि. लातूर), सलिम चांद सय्यद (23 रा.कल्याण), पंकज अंबादास घोडके (45 रा. चिंचोलीमाळी ता. केज) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातातील काही गंभीर जखमींना उपचारासाठी पुण्याला हलवले असल्याची माहिती मिळाली आहे.