बीडीओंच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा

0

सीईओंनी ग्रामपंचायतींवर दाखविला अविश्‍वास

नवापुर । नंदुरबार जिल्हयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मनमानी करुन पेसा कायदयाचे उल्लंघन करुन नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायती निधींचा योग्य वापर करत नसल्याचे जाहीर करत अविश्‍वास दाखवुन विकास कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. सीईओंचे आदेश रद्द न झाल्यास गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलुप लावण्यात येईल असा इशारा नवापूर तालुक्यातील सरपंचांनी तहसिलदार प्रमोद वसावे रांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सीईओंनी 6 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतींवर जाचक अटी लादल्या आहेत. याचा विरोध सरपंचांकडून होत आहे. दोन दिवसात निर्णय मागे न घेतल्यास गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलुप लावुन येईल तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

तहसिलदार यांना
निवेदनावर पं.स उपसभापती दिलीप गावीत, सरपंच राहुल गावीत, काळुराम गावीत, विकास गावीत, सुरज गावीत, रामकु गावीत, सुनिल गावीत, नलीणी गावीत, नकुल देसाई, सुमण गावीत, ईश्‍वर गावीत, लताबाई गावीत, कौशल्या गावीत, शिवादास वळवी, सुमन गावीत, रिना गावीत, संजय वळवी, अनिता नाईक, जयवंती गावीत, बंधु वळवी, किसन गावीत, सत्यपाल वळवी, प्रभावती गावीत, अजय कोकणी, सुहाणी गावीत, अनिल गावीत, चंदगा वळवी, हेमा पाडवी, बाबु गावीत, रामु गावीत, ईश्‍वर गावीत, सुरेश गावीत, मनोज गावीत दिलीप गावीत आदीचा सह्या आहेत. यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंचानी तहसीलदार प्रमोद वसावे यांचाशी निवेदनाबाबत सविस्तर चर्चा केली.