जळगाव । टीसीएल पुरवठा होत नसल्याने नागरिकांना जलजन्य आजाराचा त्रास होत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुक्ताईनगर तालुक्यातील झेडपी सदस्य जयपाल बोदडे यांनी उपस्थित केला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी सुनंदा नरवाडे यांना याबाबतचे स्पष्टीकरण सभेत विचारण्यात आले. नरवाडे यांनी टीसीएल खरेदीसाठी आयत्या वेळेस विषय मांडुन मंजुरी घेण्यार असल्याचे सांगितले. जलजन्य आजार रोखन्यासाठी आरोग्य विभागामार्फत काय प्रयत्न होत आहे याबात माहिती घेतली असता, जिल्हा परिषदेतर्फे जलजन्य आजार उध्दभवू नये यासाठी सर्व गावांना टीसीएल पावडरचा मुबलक पुरवठा करण्याच्या सुचना सीईओं यांच्या स्वाक्षरीने गटविकास अधिकारी यांना करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांकडून मिळाली. किमान तीन महिन्याचा टीसीएल साठा प्रत्येक गावात ठेवण्याच्या सुचना दिल्या.
पाणी दुषीत गावे (कंसात)
जिल्ह्याभरातील पाणीचे नमुने तपासले असता 1578 पैकी 133 नमुने दुषीत आढळून आले आहे. जुन महिन्याच्या नमुने तपासणीत 8 टक्के गावांतील पाणी नमुने दुषीत आढळून आले आहे. अमळनेर तालुक्यातील (11), भडगाव (3), भुसावळ (0), बोदवड (9), चाळीसगाव (24), चोपडा (22), धरणगाव (0), एरंडोल (4), जळगाव (10), जामनेर (12), मुक्ताईनगर (6), पाचोरा (3), पारोळा (8), रावेर (13), यावल (11) अशा 133 गावांमधील पाणी दुषीत आढळून आले आहे. बोदडे यांनी पावसाळा सुरु असल्याने जलजन्य आजार होय नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच टीसीएलचा साठा उपलब्ध आहे का असा प्रश्न उपस्थित करत जाब विचारले असता निधी अभावी टीसीएलसाठा कमी असल्याची माहिती नरवाडे यांनी दिली. मात्र आरोग्य विभागाच्या जुन महिन्याच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील जवळपास सर्व गावात टीसीएलसाठा उपलब्ध असुन केवळ 18 गावात साठा नसल्याचे अहवाल दिले असल्याने अहवाल चुकीचा असल्याचे दिसून येते.