बीडीडीएसचे वाहन उलटून उपनिरीक्षकासह चौघे जखमी

0

मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी जाण्यापूर्वीच सोनगीरजवळ अपघात

धुळे– नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी धुळे जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकठिकाणच्या सभास्थळी तपासणी करणार्‍या बीडीडीएस पथकाचे वाहन सोनगीरजवळ उलटल्याने उपनिरीक्षकासह चार कर्मचारी किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी सकाळीच हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिंदखेडा जाणार्‍या वाहनाला अपघात

शिंदखेडा येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने सभा स्थळासह परीसराची श्वान पथकामार्फत आधी तपासणी करण्यासाठी धुळे येथून निघालेल्या चारचाकी वाहनाचा सोनगीरजवळील रामेश्वर मंदिराजवळ अपघात झाला. सूत्रांच्या माहितीनुसार रस्त्याच्या बाजूला खडी पडली असल्याने त्यावरून वाहन गेल्याने ते उलटले व त्यात उपनिरीक्षक उपनिरीक्षक शिंदेसह चार कर्मचार्‍यांना किरकोळ मार लागला.