लंडन । भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याला पुन्हा संधी देण्याला भारतीय कर्णधार विराट कोहली इच्छा नाही.त्याने रवी शास्त्रीसाठी लँबिग केल्याचे समजत आहे.असे असले तरी भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज दौर्यापर्यंत कुंबळे यालाच संघाचा मुख्य प्रशिक्षक कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीचा असलेला विरोध झुगारून बोर्डाने कुंबळे सोबत जुळवून घे अशी तंबी वजा ताकीद दिली आहे.
भारतीय संघाचा विद्यामान प्रशिक्षक अनिल कुंबळे नको याचा पाढा वाचणारा व त्याच्या जागी रवी शास्त्री याचे नाव पुढे करणार विराट कोहली याला बोर्डाने यापुढे संघाचा प्रशिक्षक निवडतांना कर्णधार याचा वशिल्याचा विचार घेतला जाणार नाही असे धक्कादायक निर्णय प्रशासकीय समितीने दिल्याने कोहलीची डाळ काही शिजलेले नाही. हे निश्चित झाले. सल्लागार समितीने कुंबळेंना पुन्हा संधी देण्याबाबचा निर्णय घेण्यासाठी बोर्डाकडे अवधी मागितला आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण या त्रिसदस्यीय समितीने कुंबळे यांच्या पुनर्नियुक्तीवर तब्बल दोन तास चर्चा केली होती. पण अंतिम निर्णय समिती घेऊ शकलेली नाही. समितीने कोहली आणि कुंबळे यांच्याशी वैयक्तिक चर्चा केल्याचेही कळते . चॅम्पियन्स ट्रॉफीतील संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये यासाठी अंतिम निर्णय स्पर्धेनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे.