बीसीसीआयची तहकूब सभा; बुधवारी होणार

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट बोर्डाची विशेष सर्वसाधारण सभा गाजणार असे वाटत असताना ती तहकूब करण्यात आली. 70 वय ओलांडलेल्या पदाधिकार्‍यांचा सहभाग वाढला होता. या सभेला बहुतांश ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. लोढा समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्यानुसार हे बहुसंख्य सदस्य वयाची मर्यादा ओलांडल्यामुळे अपात्र ठरले आहेत. त्यात स्वतः श्रीनिवासन, निरंजन शहा, टीसी मॅथ्यू, रणजिब बिस्वल, जी. गंगा राजू यांचा समावेश होता. हिमाचल प्रदेश क्रिकेट असो.चे पदाधिकारी म्हणून बोर्डाचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण ठाकूर आले होते. रेल्वे व सेनादलाचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने श्रीनिवास व वयाच्या मुद्यावरून न्यायालयाकडे विचारणा केलेली असल्याचे कळल्यानंतर ही बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सोमवारी होणार असून त्यानंतर बुधवारी बोर्डाची बैठक होणार आहे. सौराष्ट्रचे माजी अध्यक्ष निरंजन शहा यांनी यावेळी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सोमवारी होत आहे. हा सगळा कायदेशीर मामला असल्यामुळे बोर्डाचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांनी ही विशेष सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या सभेला बहुतांश ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. लोढा समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्यानुसार हे बहुसंख्य सदस्य वयाची मर्यादा ओलांडल्यामुळे अपात्र ठरले आहेत.