नवी दिल्ली । बीसीसीआयच्या तांत्रिक समितीची बैठक सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली 2 ऑगस्टला कोलकाता येथे बैठक घेणार आहे. यात रणजीच्या सामन्यांबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.2016-17च्या रणजी मोसमासाठी बीसीसीआयने रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी त्रयस्थ ठिकाणांची कल्पना राबवली होती. मात्र यावर टीका करण्यात आली. यावर रणजी संघांच्या जळपास सर्वच कर्णधारांनी नाराजी व्यक्त केली.
यंदा मोसमाच्या सुरुवातीला मुंबईत पार पडलेल्या कर्णधारांच्या परिषदेतही यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे पुर्वीसारखीच गृह आणि बाहेर अशा दोन्ही मैदानांचा मिलाफ असणारी प्रणाली सुरू करावी अशी मागणी पुढे आली आहे. त्रयस्थ ठिकाणच्या संकल्पनेमुळे बर्याच संघांना जवळपास साडेतीन महिने सातत्याने प्रवास करण्याची वेळ आली होती. यामुळे ते घर आणि कुटुंबियांच्या सहवासाला मुकतात. यामुळे आता यावर धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.