मुंबई । बीसीसीआय व सर्वोच्च न्यायालयात याच्या सुरू लोढा समितीच्या शिफारशीवरून वाद सुरू होता.शेवटी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या पदाधिकार्यांना त्याच्या पदावरून पायउतार केले. ही लढाई सुरू असतांना बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडूसाठी अॅमस्टडॅम स्थित कंपनीला बीसीसीआय लोगो असलेल्या सुटकेसेशी बनविण्याचे आदेश दिले होते.अमेरिकेच्या फ्लेरिडामध्ये वेस्ट इंडिजविरूध्दच्या ट्वेन्टी-20 सामन्यापुर्वी कर्णधार विराट कोहलीने संघातील खेळाडूंना साहित्य वाहून नेण्यासाठी नव्या सुटकेसची मागणी केली होती.
अंतिम स्वाक्षरीचा प्रश्न अजून प्रलंबित
या मागणीनुसार बीसीसीआयने तीन वेगवेगळ्या आकारांच्या बोधचिन्ह असलेल्या 134 सुटकेसेस मागविल्या होत्या.मात्र सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविले होते.त्यामुळे सुटकेसची ऑर्डर स्विकारण्यासाठी लागणार्या अंतिम स्वाक्षरीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. त्यात नव्या पदाधिकार्याबाबतही अद्याप स्पष्टता न आल्याने याबाबत निर्णय कोण घेणार?हा प्रश्न बीसीसीआयसमोर निर्माण झाला आहे.या सुटकेशी मुंबईच्या बंदरावरील गोडाऊनमध्ये 27 लाख किमतीच्या सुटकेसेस धुळखात पडलेल्या आहे.
धुळखात पडलेल्या सुटकेसेचा लिलाव होणार नाही. याप्रकरणी बीसीसीआयकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू झाले आहे.असे अॅमस्टडॅम स्थित कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरच कोहली अँड कंपनीला या नव्या सुटकेससह क्रिकेट दौरे करता येतील. ज्या 134 सुटकेस आज मुंबईच्या बंदरात धुळखात पडलेल्या त्याची ऑर्डर देण्यात आली होती त्यावेळेस बीसीसीआयच्या सचिव पदावर अजय शिर्के होते.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]
मात्र त्यांनी यासंबंधित माझ्याकडून ऑर्डर देण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असे सांगितले आहे. यापुढे शिर्के म्हणाले की, ऑर्डर देण्यात आल्यानंतर मला याबाबतीच सांगण्यात आले. खरेदीबाबत सुटकेस निर्मात्या कंपनीशी ई मेलच्या माध्यमातून संपर्क आला असता कंपनीच्या अधिकार्याने संघाच्या खेळाडूंना नव्या सुटकेस पाहिजे होत्या त्यासंदर्भात बीसीसीआयकडूनच ऑर्डर देण्यात आली होती. असे सांगितले.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच शांघायहून सुटकेसेस पाठविण्यात आल्या पण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्या गोडाऊनमध्ये पडून आहेत.
रतसर कागदपत्रांची पुर्तता
मात्र फ्लोरिडा दौर्यावेळी 25 पेक्षा अधिक खेळाडू संघात सहभागी नसताना 134 सुटकेस का मागविल्या.असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. मात्र पदाधिकारी न्यायालयाच्या आदेशाने पायउतार झाल्याने त्यांच्या जागी आलेल्या अधिकार्यांना अधिकाराबाबत स्पष्टता नसल्यामुळे सप्टेंबरपासून 27 लाख किमतीच्या सुटकेसेस गोडाऊनमध्ये धुळखात पडलेल्या आहे. रितसर कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यावर 8 लाखांचा भुर्दंड बीसीसीआयला भरावा लागणार आहे.