मुंबई । लोढा समितीच्या शिफारशींवर आधारभूत अशी नवी घटना तयार करण्यात आली आहे. त्यामुळ मुंबईचे पूर्ण सदस्यत्व रद्द करून मुंबईला सहसदस्य करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या नव्या घटना दुरूस्तीनंतर तयार करण्यात आलेले नवे नियम म्हणजे एक मोठा विनोद आहे असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री याने व्यक्त केले आहे. यापुढे बोलतांना म्हणालाकी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रणजी विजेतेपदे पटकावणार्या मुंबईचे हेतुपुरस्सर पंख छाटण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई देशातील सर्वांत जुनी संघटना आहे, असेही ते म्हणाले.नव्या घटनेनुसार प्रत्येक राज्याला पूर्ण सदस्यत्व व मताचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, महाराष्ट्र व विदर्भ या तीन संघटनांना आळीपाळीने तीन वर्षांत एकदाच (एका वर्षीच) मतदान करता येईल.