भुसावळ प्रतिनिधी दि 7
आगामी निवडणुका बघता मतदान याद्यांचे काम पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीमध्ये अन उपस्थित असलेल्या बी एल ओ 40 तर उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या 20 बी.एल.ओ. यांना आरपीआय अधिनियम 1950 चे कलम 34 प्रमाणे देण्यात आलेल्या होत्या. यापैकी बी.एल.ओ. अजय डोळे यांनी निवडणूक आयोगाचा सर्व नियमांची पायमल्ली केल्याने उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने मतदान यादीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. यानुसार पंचायत समितीच्या हॉलमध्ये भुसावळ तालुक्यातील सर्व बी. एल. ओ. यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार लीना लबडे, नायब तहसीलदार अंगद अंसटकर उपस्थिती होती.
या आढवा बैठकीला तालुक्यातील 313 पैकी 40 बी.एल.ओ.बैठकीला गौरहजर असणाऱ्यांचा नोटीस बजावून त्यांच्यावर भविष्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.
सदरील आढावा बैठकीमध्ये दिव्यांग मतदार नावामध्ये दुरुस्ती नावामध्ये बदल, मयत झालेल्यांची नावे कमी करणे, अस्पष्ट फोटो असलेल्यांचे फोटो घेऊन ते अपडेट करणे तसेच मतदान यादी मधील 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार असल्यास त्यांच्या घरी जाऊन खात्री करून घेणे, घर टू घर मतदारांची नोंदणी करणे याचबरोबर ज्या युवा मतदारांचे अठरा वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांची मतदान यादी मध्ये नाव नोंदणी करणे अशा सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचे पालन न करणे, सतत गौर हजर राहणे, तसेच नोटिसचे उत्तर न देणे, अरेरारीची भाषा करणे असे बी.एल.ओ. अजय डोळे यांच्यावर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती दिली.