जळगाव । केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांसाठी 7 वे वेतन आयोग लागू केले आहे. बीएसएनएलमध्ये केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असूनही आजपर्यंत तिसरा वेतन आयोग पूर्णपणे कार्यान्वित झालेला नाही. यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. सरकारने जानेवारी 17 पासून बीएसएनएलमध्ये पे रिव्हीजन व पेन्शन रिव्हीजन तिसरा वेतन आयोगामार्फत लागू करावे तसेच जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी मेडिकल बिले ताबडतोब अदा करावी याच्या सह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय बी.एस.एन.एल. डी.ओ.टी. पेन्शनर्स संघटनेतर्फे दि. 25 मे रोजी बी.एस.एन.एल. कार्यालयासोमर धरणे आंदोलन करण्यात आले.
कर्मचार्याचा होता सहभाग
जिल्हा सचिव आर. एन. पाटील अध्यक्ष ए.एस. चौधरी एम.डी. बढे, परकाळे, एस.एन. चौधरी, एम.एस.पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. धरणे देण्यासाठी बी.एस.एन.एल कार्यालया बाहेर कर्मचारी यावेळी सहभागी झाले होते. यामध्ये ए.पी. मसीदास, एस.डी.पाटील, एस.के. भामरे, एस.एन.चौधरी, एम.डी. बढे, ए.एच. बढे, एस.व्ही. वैद्य, आर.एच. सुपे, पी.जी. फडणवीस, एम.एस.पाटील, आर.टी.काळे, बी.बी.चौधरी, सी.डी. पाटील, शेख रशीद शेख अहमद, इ.बी. गुरुचल, एस.एन. नेवे, सौ. टेनी मॅडम, फरीदा खान, आशा कोल्हे, राजश्री पाटील, ए.एस. साखरे, एम.बी. वाणी आदी सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सहभाग होता.