मुंबई : मेडिकल स्टोर मध्ये फार्मासिस्ट मिळत नसल्यामुळे यापुढे बी. फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या तत्वावर काम करण्याची परवानगी देण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या प्रश्नावर आज विधानसभेत केली.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्या वाचण्यासाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]
राज्यातील औषधांच्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट ठेवणे बंधनकारक असून असे फार्मासिस्ट मिळत नाहीत, त्यामुळे औषध विक्रेता दुकानदाराची गैरसोय होतेच तसेच रुग्णांचे ही नुकसान होते. त्यामुळे याबाबत सरकारने योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली. दहिसर येथील साई शिवाई फार्म मधून बनावट इनहेलर चा साठा जप्त करण्यात आला होता याबाबतचा तारांकित प्रश्न आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रुग्णांची आणि औषध विक्रेत्यांची होणारी गैरसोय याकडे सरकारचे लक्ष वेधले त्यावर उत्तर देताना मंत्री गिरीश बापट म्हणाले की, मेडिकल स्टोर मध्ये फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. मात्र तेवढे फार्मासिस्ट उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी बी.फार्म शिकणारी मुल ही शिकत असताना कमवा आणि शिका या तत्वावर मेडिकल स्टोर वर काम करू शकतील अशी परवानगी सरकार कडून देण्यात येईल जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.