जळगाव । येथील बी.यु.एन.रायसोनी मराठी विभागाच्या शिशुविहार विभागातर्फे 31 जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा सोनार व मुख्याध्यापिका रेखा इंगळे, इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापीका नलीनी शर्मा या होत्या. भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी व परस्परांविषयी असणारा स्नेहभाव अधिक वृध्दींगत करण्यासाठी संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू, वाण वाटप कार्यक्रम आयोजीत केला होता. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. महिलांसाठी मनोरंजन म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
उखाणे स्पर्र्धेत योगिता पाटील विजयी
स्पर्धांमध्ये दोन मिनीटात चेहर्यावर टिकल्या लावणे व उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. यातील टिकली लावणे स्पर्धेतील विजेत्या योगिता प्रविण पाटील व उखाणे स्पर्धेत विजयी ठरलेल्या योगिता संदीप पाटील यांना बक्षीस देण्यात आले. यानंतर आलेल्या सर्व पालक महिला वर्गाला शिशुविहारच्या शिक्षीकांनी हळदीकुंकू लावून वाण वाटप केले. पल्लवी रायसोनी यांची उपस्थिती शाळेतील प्रत्येक कार्यक्रमाला शाळाध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांची उपस्थिती असते. मात्र शिशुविहारने आयोजीत केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला शाळेचे उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या सौभाग्यवती पल्लवी उमेद रायसोनी यांनी उपस्थिती देवून शिक्षक वृंदांचा उत्साह वाढविला.
कापडी पिशव्यांचे वाण
भास्कर मसाले जळगाव एमआयडीसी, यांनी पर्यावरणाचा होत असलेला र्हास, प्लॅस्टीक पिशव्यांचा अती वापर याचा विचार करता जनजागृती म्हणून व आपणही समाजाचं देणं लागतो या उदात्त हेतूने भास्कर मसाले कंपनीचे मालक भास्कर नामदेव महाजन यांचेकडून हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी महिलांना कापडी पिशव्यांचे वाण म्हणून वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यशस्वीतेसाठी मनिषा नरेंद्रसिंग पाटील, अंजली प्रकाश बागुल, सोनाली लक्ष्मण बडगुजर, रिना मुरलीधर जंगले यांचेसह शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला.