बुथ जितो, देश जितो -माजी मंत्री एकनाथराव खडसे

0

तळवेलसह खडक्यात बुथ प्रमुखांचा मेळावा – पक्षासाठी झोकून कामाचे आवाहन

भुसावळ- नागरीकांच्या अडी-अडचणी समजून घ्या, त्यांना अडचणीत मदत करून आमदार, खासदारांनी केलेल्या कामांचा आढावा तयार करा व केंद्र शासनाच्या योजना शेवटच्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा, कार्यकर्त्यांनी-मतदारांशी संपर्क वाढवा व बुथ जिंकल्यास देशही जिंकू, असा आत्मविश्‍वास माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त करीत पायाला भिंगरी लावून सक्रियतेने भाजपा पक्षासाठी झोकून काम करा, असे आवाहनही त्यांनी बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात केले. तालुक्यातील तळवेल व खडका येथे रावेर लोकसभा क्षेत्रातील जिल्हा परीषद गटनिहाय बुथ प्रमुख व बुथ समिती सदस्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी खडसे बोलत होते. प्रसंगी सुनसगाव येथे के.टी.वेअर बंधार्‍याचे जलपूजन करण्यात आलेफ

यांची मेळाव्यास उपस्थिती
माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, भुसावळ विधानसभा विस्तारक दिनेश नेमाडे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंचायत समिती सभापती प्रीती मुरलीधर पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य नारायण पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी, माजी सभापती सुनील महाजन, तालुका उपाध्यक्ष रवींद्र इंगळे, सरचिटणीस नारायण कोळी, जळगाव दूध संघ संचालिका श्यामला अतुल झांबरे, पंचायत समिती सदस्य वंदना सदानंद उन्हाळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व कठोरा सरपंच प्रशांत पाटील, फुलगाव सरपंच वैशाली काकोडे, बेलव्हाळ सरपंच लालाभाऊ पाटील, तळवेल माजी सरपंच इंदिरा पाटील आदींची उपस्थिती होती.