भुसावळ। तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त शहर व परिसरात अन्नदान, प्रतिमा पूजन तसेच रॅलीसह विविध कार्यक्रम घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
राजीव गांधी वाचनालय
येथील राजीव गांधी वाचनालयात भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विवेक नरवाडे, नितीन पटाव, कल्पना तायडे, भिमराव तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार निळकंठ फालक, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा, अॅड. एम.एस. सपकाळे, दलितमित्र लालाजी ढिवरे, आंतरराष्ट्रीय धावपटू आर.बी. भवार, सलिम गवळी, डॉ. नईम मजहर, अन्वर खान, विनोद शर्मा, यु.एल. जाधव, दिपक जैन, प्रदिप नेहेते आदी उपस्थित होते.
बौध्द धम्म प्रतिष्ठान
रावेर येथील जय भीम बौध्द धम्म प्रतिष्ठानतर्फे भगवान गौतम बुध्द यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष संजीव तायडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच बुध्द वंदना घेवून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्र तायडे यांनी भगवान बुध्द यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन शिवा तायडे, डी.टी. मोरे, पी.आर. तायडे उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंघ
भारिप बहुजन महासंघातर्फे नगरपालिका रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, दिनेश इखारे, शिवाजीराव टेंभुर्णीकर, प्रमोद बावस्कर, भिमराव साळुंखे, अरुण नरवाडे, रविंद्र कुळकर्णी, संदिप मोरे, रामचंद्र साळुंखे, धनराज बोरोले, संदिप सुरवाडे, सौरभ मोरे, गोपीचंद सुरवाडे, संतोष सुरवाडे आदी उपस्थित होते.
सावद्यात ठिकठिकाणी कार्यक्रम
बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात ठिकठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमापूजनासह अभिवादन करण्यात आले. आंबेडकरनगरातील नालंदा बौद्ध विहारात सकाळी वाजता अभिवादन झाले. येथे बी.जी.लोखंडे यांनी बुद्धवंदन म्हटली. बस स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे, नगरसेवक विश्वास चौधरी, बौद्ध ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष सतीष लोखंडे, अशोक बडगे, प्रकाश लोखंडे, बबन बडगे उपस्थित होते.
भोळे महाविद्यालयात प्रतिमा पूजन
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात तथागत भगवान गौतम बुध्द व क्रांतिसुर्य महाराणा प्रताप जयंती संपन्न झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी. फालक यांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बुध्द वंदना प्रा. डॉ. संजय बाविस्कर यांनी केले, प्रसंगी उपस्थित प्रा. डॉ. जी.पी. वाघुळदे, वाय.डी. चौधरी, प्रकाश सावळे, विद्यार्थी रंजीतसिंग राजपूत यांनी महाराणा प्रताप यांंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक समिति दे. ना. भोळे महाविद्यालय परिश्रम घेतले.