बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारताची सर्वांना मदत – नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली – भगवान बुद्धांनी जगाला सेवेचा संदेश दिला आहे. भगवान बुद्ध यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत. याच पावलावर पाऊल ठेवून भारत सवार्र्ंना मदत करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेचेच्या निमित्त्ताने आयोजित एका कार्यक्रमात केले.

ऑनलाईन पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, यावेळी परिस्थिती वेगळी आहे, जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणे माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असते, परंतु सद्य परिस्थिती त्यास परवानगी देत नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करत आहे, मग तो देशात असो की परदेशात, या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. कोणताही स्वार्थ न बाळगता आपल्याला आपल्या कुटुंबाचे तसेच परिसराचे संरक्षण करावे लागेल. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. सामाजिक कार्य निरंतर सेवेने केले पाहिजे, इतरांवर करुणा असणे महत्त्वाचे असते, असेही मोदी म्हणाले आहेत. आजारी लोकांवर उपचार करण्यापासून रस्त्यांवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक जण आपल्यासाठी सेवा देत आहे. आज जग अशांत आहे, अशा वेळी बुद्धांची शिकवण महत्त्वाची आहे, असेही मोदींनी नमूद केले.