मुंबई – भारतीय बौध्द महासभा शाखा महिला खारदेव नगर घाटला चेंबूर विभाग व भारतीय बौध्द विकास मंच यांच्या वतीने वर्षावावास मालिका कार्यक्रम छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा खारदेव नगर येथे शाखेच्या कोषाध्यक्ष आयू.संगिता रविंद्र पंडित यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आंबेडकर भवन येथून केंद्रीय शिक्षक आयू.विलास खाडे हे उपस्थित होते. त्यांनी गौतम बुद्ध यांचा गृहत्याग या विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयू. जगदिप कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयू.सिंधूबाई अभंग यांनी स्वीकारले, तर यावेळी समाजसेवक राजेंद्र नगराळे आणि मनिषा गंगावणे उपस्थित होते.