नंदुरबार । पुणे येथे नुकत्याच राज्य बुध्दीबळ संघटना पदाधिकार्याच्या निवडणूका पार पडल्या. यात नंदुरबारचे बुद्धीबळ प्रशिक्षक व संघटक शोभराज खोंडे यांची सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. शोभराज खोंडे हे राज्याच्या बुद्धीबळ संघटनेत सर्वात युवा पदाधिकारी म्हणून तसेच राज्य संघटनेवर निवडून आलेले नंदुरबार जिल्ह्याचे पहिले क्रीडा संघटक ठरले आहे. शोभराज खोंडे हे सध्या शासकीय आश्रमशाळा ढोंगसागाळी येथे व्यवसाय क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. अश्वमेघराज चेस क्लब व नंदुरबार जिल्हा हौशी बुद्धीबळ संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य संघटनेने शोभराज खोंडे यांची राज्य बुध्दीबळ संघटनेवर निवड करत त्यांच्यावर मध्य महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली. निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षपदी नागपुर येथील विधान परिषेदेचे आमदार डॉ. परीनेय फुके तर सचिव पदी सांगली येथील प्रसिद्ध उदयोगपती संजय केडगे यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी औरंगाबादचे विजय देशपांडे, उपाध्यक्ष पदी मुंबईचे प्रफुलल झवेरी तर कोषाध्यक्ष म्हणून पुण्याचे राजेंद्र कोंडे यांच्यासह इतर पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.