अमळनेर । समाजातील व्यक्तींमध्ये सकारात्मक, नकारात्मक आणि शक्तिशाली असे तीन दृष्टिकोन दिसून येतात मात्र ज्याच्या अंगी शक्तिशाली दृष्टिकोन असेल तर तुमच्या वर्तनाचे परिणाम आजूबाजूला दिसतील शिक्षकांनी युक्तीने बुद्धीने गणित दाखवले तेव्हाच मुलाला आयुष्याचे गणित जमेल, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी अमळनेर येथील गणित प्रशिक्षण वेळी केले. राष्ट्रीय शिक्षा अभियान अंतर्गत आयआयटी मुंबई व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नववी व दहावीच्या गणित शिक्षकांचे गुणवत्ता विकास प्रशिक्षण येथील सानेगुरुजी विद्यालयात आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉ पाटील बोलत होते.
प्रशिक्षणात चार तालुक्यांचा समावेश
अमळनेर, धरणगाव, पारोळा व चोपडा आशा 4 तालुक्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते. स्पर्धा परीक्षेत बिहार खूप पुढे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी शिक्षकांना साधी गणिते विचारून गणिताकडे कशा विचारांनी बघावे याचे मार्गदर्शन केले. जिल्हा गणित समन्वयक डॉ. राजेंद्र महाजन, डॉ.डी.बी.साळुंखे यांनी ही शिक्षकांना मार्गदर्शन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक डी.ए.धनगर, दीपक महाजन, नितीन कोठावदे, सुनील महाजन यांनी प्रशिक्षण दिले. गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्हाडे यांनीही भेट देऊन तपासणी केली. यावेळी संयोजक प्रमोद पुनवटकर, संस्था सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, किशोर पातील हजर होते.