भुसावळ । राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत पालिका रुग्णालयातर्फे 15 बंगला भागातील बौद्ध विहारात आरोग्य शिबिर घेण्यात आले. नगरसेविका पुजा सूर्यवंशी यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. डॉ. दिप्ती चौधरी, डॉ. अवनी ढाके, डॉ. जयप्रकाश खडसे यांनी 210 रुग्णांची तपासणी केली. नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, आरोग्य समिती सभापती दीपाली बर्हाटे, पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी सहकार्य केले. राजू सूर्यवंशी, राजेंद्र आवटे आदी उपस्थित होते. गरजू रुग्णांना औषधे वितरीत करण्यात आली.