धुळे । सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे समाज कल्याण कार्यालयातील गुंडगिरीच्या भाषा करणारे शासकीय कर्मचारी शंकर महाजन व संजय सैंदाणे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, समाज कल्याण विभागात मंगळवार 21 मार्च रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास आम्ही विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्ती कामानिमित्त व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नाही, अशी विचार केली असता त्याचा राग येवून शंकर महाजन यांनी विद्यार्थ्यांशी गुंडागिरीची भाष व गैरवर्तणूक केली. विद्यार्थ्यांची अरेरावी करत विद्यार्थ्यांना म्हणाले , तुम्ही आधी झोपला होतेस का, ईमेल आयडी काय शोसाठी ठेवला आहे का, तुझ्यासाठी आम्ही रिकाम्या नाहीत, म्हणत अश्लील भाषेत विद्यार्थ्यांना धमकवण्यात आले. विद्यार्थ्यांना वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करतो, असे सांगातच संजय सैंदाणे यांनी महाजन यांची बाजू घेत, मी पण तुला शिष्यवृत्ती कशी मिळते हे बघतो, अशी गुंडगिरीची धमकी विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे हा भारतीय राज्य घटनात्मक अधिकारी आहे तरी हे अधिकारी विसरले. अशा त्रास विद्यार्थ्यांनी किती सहन करावा लागेल. प्रशासन हे विद्यार्थ्यांची फसवणूक व पिळवणूक करत आहे. याच्या निष्काळजीपणा करणार्या कर्मचार्यांना निलंबीत करावे, अशी मागणी केली. अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश जगताप, शहराध्यक्ष योगेश अहिरे, इंद्रजित करंडक, बंटी कांबळे, मयुर खरात, निलेश अहिरे, सागर शिंदे हे उपस्थित होते.