धुळे । जगाला शांततेचा संदेश देणार्या भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती समितीच्यावतीनेही शहर पोलीस ठाण्यासमोरील पुतळ्याजवळ सामुहिक बुध्दवंदनेचा व धम्मवंदनेचा कार्यक्रम झाला. यावेळी समितीचे पदाधिकारी वाल्मिक दामोदर, शंकरराव थोरात, अॅड.गोपिसागर धिवरे, हरिश्चंद्र लोंढे, राजेश ओहोळ, ज्ञानेश्वर भामरे, रत्ना बडगुजर, ममता नगराळे, प्रल्हाद मंगळे, अवचित बैसाणे, संदीप पगारे, बापू नेरकर, जी.व्ही.मोरे, भटेसिंग पानपाटील यांच्यासह अनुयायी उपस्थित होते.