रावेर : बुद्धांनी दिलेले पंचशील आर्य अष्टांगीक मार्ग व दहा पारिमिता वैयक्तीक जीवनात अनुसरण केल्यास दुःख मुक्त होऊन तो सदमार्गी लागत असल्याचे प्रतिपादन बौद्ध धम्म समितीचे केशव सोमकुंवर यांनी केले. नागपुरहुन निघालेली बौद्ध धम्म प्रचार समितीचे आगम 2 रोजी दुपारी 3 वाजता झाल्याने त्याचे तालुक्यातील बौद्ध उपासक यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. या बौद्ध धम्म समितीचा मुळ उद्देश घेऊन समितीचे केशव सोमकुंवर यांनी उपस्थित बौद्ध बांधवाना बुद्ध धम्माविषयी व बाबासाहेबांचे तत्व-सिद्धांत या विषयावर मार्गदर्शन केले.
स्वागत कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कामगार नेते दिलीप कांबळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के.सी. गाढे, पुंडलिक कोघे, युवा जिल्हा अध्यक्ष राजु सवर्णे, बसपा जी.प्र.महेश तायडे, सामाजिक समाता मंच कार्याध्यक्ष उमेश गाढे, बीएसपी तालुका अध्यक्ष सुधीर सैगमिरे, संजय भालेराव, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष विजय अवसरमल, केंदीय शिक्षक संघरत्न दामोदरे, युवराज तायडे, बौद्धाचार्य सदाशिव निकम, विजय भोसले, ज्ञानेश्वर अटकाळे, सिताराम तायडे, राजु बाहे, वैभव वानखेडे, तुषार भालशंकर यांसह तालुक्यातील असंख्ये बौद्ध उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्रीय शिक्षक युवराज तायडे यांनी तर आभार बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे यांनी मानले.