मेलबर्न-भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव १५१ धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. बुमराहने केवळ ३३ धावा देत ६ बळी टिपले. याशिवाय जडेजाने २ तर इशांत आणि शमीने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. त्यामुळे पहिल्या डावानंतर भारताला २९२ धावांची आघाडी मिळाली.
खेळाच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळून पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. दरम्यान भारताने खेळायला सुरुवात केली असून ५२ धावांवर ५ गडी बाद झाले आहे.