रात्री नऊच्या दरम्यान कर्जोत नजिक घटना
रावेर-बुरहानपुर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर कर्जोद-खानापूर दरम्यान अज्ञात दोन मोटरसायकल स्वारांनी स्विप डिझायर गाडीच्या काचांवर अंडे फेकुन गांडी थांबवत गाडी चालकांच्या डोळ्यात तिखट फेकून त्यांच्या जवळील सुमारे ८१ हजार व धनादेश लुटण्याची घटना आज रात्री कर्जोत येथील ओंकारेश्वर सहकारी साखर कारखान्या जवळ घडली आहे यामध्ये स्विप डिझायर गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे .
या बाबत वृत्त असे की नाथूसिंग छोटूसिंग मेडतीया वय २८ रा राजस्थान ह मु राधाकृष्ण नगर जळगाव हे आपल्या साथीदारासह बुरहानपुर कडून जळगाव येथील आपल्या कपडा व्यापा-य करणा-या मालकाची वसूली करून स्विप्ट डिझायर गाडी क्र एमएच १९ बियु ४४४६ ने जळगावकडे जात असतांना कर्जोत दरम्यान दोन अज्ञात मोटरसायकलस्वार चोरटयांनी स्विप डिझायर गाडीच्या पाठलाग करत गाडिच्या काचावर अंडे फेकुन स्विपडिझार गाडीला थांबवुन ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पावडर फेकुन ड्राय्वहरसह एकाला मारहाण करीत त्यांच्या जवळुन ८१ हजार नगद व काही धनादेश लुटून दोघं मोटरसायकल स्वारांनी पोबारा केला आहे नाथूसिंग मेडतीया यांच्या फिर्यादि वरुन रावेर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटयांन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन रात्री घटनास्थळी डिवायएसपी राजेंद्र रायसिंग, सपोनी गजेंद्र पाटील,पोउनि दीपक ढोमने,आदीनी भेट दिली असुन घटनेचा तपास पोउनि मनोहर जाधव व सहकारी करीत आहे