बुलंदशहर-उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे गो-हत्येच्या संशयावरून जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली तसेच या घटनेत सुबोध कुमार सिंह या पोलीस निरीक्षकाची हत्या देखील करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. ८७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमागे बजरंग दल या हिंदुवादी संघटनेचा संयोजक योगेश राज हा मुख्य आरोपी असून तो अद्याप फरार आहे.
योगेश राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनभावना भडकविण्याचे आरोप त्याच्यावर आहे. योगेश राज हा २०१६ मध्ये बजरंग दलचा संयोजक म्हणून काम करतो आहे.