बुलंदशहर-कथित गो-हत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात सुबोध कुमार या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पवन कुमार असे आरोपीचे नाव आहे. आतापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्यापही ५२ आरोप फरार आहे. फरार आरोपींना शोधण्यासठी पोलीस प्रयत्न करीत आहे.
पवन कुमारची चौकशी सुरु असून त्याच्याकडून इतर आरोपींबाबत विचारणा केली जात आहे.