बुलंदशहर हिंसाचार: ६ जणांना अटक; परिस्थिती आटोक्यात

0

लखनऊ- उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कथित गो-हत्येच्या आरोपामुळे झालेल्या हिंसाचारात सुबोध कुमार सिंह या पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाला होता. याबाबत संपूर्ण देशात वातावरण तापले आहे. दरम्यान हिंसाचाराशी संबंधित ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच चौकशीचे आदेश देखील दिले आहे.

दरम्यान आता स्थिती पूर्ववत झाली असून शांततेचे वातावरण आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे. घटनेमागे कोणत्या संघटनेचे नाव समोर आलेले नाही, मात्र बजरंग दलाच्या संयोजकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या हिंसाचार प्रकरणी ८८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.