बुलढाणा जिल्ह्यातील इसमाची वरणगावच्या रेल्वेच्या ओव्हरहेडच्या खांबावर आत्महत्या 

0
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव रेल्वे स्थानकापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या रेल्वेच्या नागपूर लाईनवरील ओव्हरहेडच्या इलेक्ट्रीक खांबाला बुलढाणा जिल्ह्यातील आळंद गावातील सुभाष खार्डे (58) या इसमाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या  केल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उउाली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार रेल्वेचा ओव्हर हेड लाईनचा खांब क्रमांक 457 12 वर सुभाष नामदेव खार्डे (58)  याने रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे खांबाला दोरीने गळफास घेतला. मयताच्या खिशात डायरी, मतदान कार्ड, आधार कार्ड या कागदावरून त्याची ओळख पटली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. तपास लोहमार्गचे उपनिरीक्षक नारायण शिरसाठ,  एएसआय बबन शिंदे करीत आहेत.