मुक्ताईनगर- बुलेटवरून पडल्याने वाघोदा बु.॥ च्या 53 वर्षीय केळी उत्पादकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 4 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चांगदेव-चिंचोलदरम्यान घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मधुकर दत्तात्रय महाजन (सुपे, 60, वाघोदा बु.॥) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार चांगदेव शिवारात बुलेट (क्रमांक एम.एच.19 बी.यु.0555) वरून जात असलेले काशीनाथ उर्फ गोटुशेठ वसंत महाजन (सुपे, 53, वाघोदा बु.॥) हे अचानक खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना उपजिल्हारुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तपास हवालदार श्रावण जवरे करीत आहेत. समजलेल्या माहितीनुसार, महाजन हे आपल्या चांगदेव शिवारातील शेतीकडे बुलेटवरून एकटेच जात होते. हृदयविकारानेवा चक्कर येवून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा? असा अंदाज आहे.