बुलेट घसरून एकाचा मृत्यू

0

वडगावः भरधाव वेगातील बुलेट भर रस्त्यात घसरल्याने खाली पडलेल्या दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (5 मार्च) सकाळी सहा वाजता वडगाव पुलावर घडला. या अपघातात निकेत राजेंद्र पाटील (वय-22, रा.मानाजीनगर, नर्‍हे, पुणे) या संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत निकेत पाटील हा रविवारी पहाटे वारजेकडून नवले पुलाच्या दिशेने बुलेट दुचाकीने जात असताना वडगाव पुलावर त्याची बुलेट घसरली आणि तो खाली पडला. दुचाकी वेगात असल्याने तो या अपघातात गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक घाडगे अधिक तपास करीत आहेत.